STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

एक दिवा समानतेचा..

एक दिवा समानतेचा..

1 min
286

झोपडीत त्या गावकुसाबाहेर च्या

एक दिवा समानतेचा तु लावुन ये

वाहु लागले जरी वारे समानतेचे

तरी तुझ्या मनात लपलेल्या

जातीभेदाच्या चोराला जरा मिटवून ये

एक दिवा समानतेचा तू लावून ये!!


मानव जात सारी एकसमान

तरी उच्च-नीचतेचा का करतो तू बडेजाव

लोकशाहीत आहे आता सर्व समान

जरा तुझ्या बुद्धीला पटवुन देत

एक दिवा समानतेचा तू लावून ये!!


कोण म्हणतो शिवाशीव नष्ट झाली आहे

पुर्वी उघडपणे आज चोरून चालली आहे

माणसाशी माणसासम जरा वागून घे

झोपडीत त्या गावकुसाबाहेरच्या

एक दिवा समानतेचा तू लावून ये!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational