STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy Others

3.5  

Jyoti gosavi

Tragedy Others

एक अज्ञात विषाणू

एक अज्ञात विषाणू

1 min
501


एका अद्दृष्य विषाणू ने

माजवलाय हाहाकार

दिसेल त्या गोष्टीचा

करतोय स्वाहाकार


त्याला दिसत नाही

कोणताच जात धर्म

स्वच्छता राखणे हेच

त्याला नष्ट करण्याचे वर्म

नका फिरू इकडे तिकडे

नाहीतर आडवे करील

 तुम्हाला तुमचेच कर्म


त्याने पेटवलय यज्ञकुंड

घेतोय आहुती साऱ्यांची

गोरे असोत वा काळे

नाही भीती कोणाची


गरीब नाही श्रीमंत नाही

नाही कोणता भेदभाव

मिळेल त्या मनुष्य प्राण्यावर

मारतोय बघा ताव


त्याला तर सुटलीय

साऱ्या जगावर राज्य

करण्याची हाव

आता कोणत्याही देवाला

 नका म्हणू

की देवा मला पाव

कारण तुम्हाला नडली

तुमच्या जीभेची हाव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy