STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy Others

4  

Umakant Kale

Tragedy Others

एक आठवण

एक आठवण

1 min
218

तिची आठवण 

न कळत येत आणि 

आयुष्यातील अनेक क्षण 

पुन्हा जिवंत होऊन उभे राहते.

कसे सांगू तिला आठवणीचं

तिच्या पेक्षा जास्त जवळ

तिची आठवण मला वाटते..

नाही तिला बोलता येत

कधी मनातले माझ्या,

रंगातलं आठवणीचं

तू गाव मला दिसून येते.

तू दिलेल्या प्रत्येक क्षणाची

किमत कशी चुकवायची मी,

मंत्ररलेल्या रात्रीची ते

चांदण तुझ्या शिवाय अधुरे आहे.

आयुष्यातील ही कांदबरी 

त्याचं तू अपुर्ण पान

ज्यावर मला खूप काही

लिहायचं होत.

खूपच काही सांगायचे

तुला गं होते.

पण तू तर येत च नाही

तुझी आठवण न चुकता

रोज भेटायला येते

अमुल्य क्षणाचा स्पर्श करून

पुन्हा पुन्हा मला जिवंत करते

पुन्हा पुन्हा मला जिवंत करते...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy