द्यावा लागे वेळ जाेडून ठेवण्
द्यावा लागे वेळ जाेडून ठेवण्
कुटुंब समायोजन नाही हो तोंडचा खेळ!
जोडून ठेवण्या कुटुंब द्यावा लागे वेळ!!
कुटुंबातील संम्बध ठेवा खेळीमेळीचे!
सर्वांचे आयुष्य राहाणारच ना धावपळीचे!!
दोन गोड शब्द बोलत जा हसून!
राग भांडण सोडा,नका राहू कोपऱ्यात बसून!!
वडीलधार्या वयोवृद्धांनाही आपलेच म्हणा!
आई वडीवडीलच असतात पाठीचा कणा!!
एकमेकांना समजून घ्या आपलं माणूस म्हणून!
नका काढू उणी दुणी अन जूने वाद ते खणून!!
विसरून भांडे तंटे नित्य स्मरा फक्त गोडच आठवणी!
आल्या गेल्या पाहुण्यांची प्रेमानं
करा स्वागत व पाठवणी!!
सारेच आहोत येथे एकाच हाडा मासांचे!
जन्मले सारे येथे मातेच्या पोटी नवमासांचे!!
प्रत्येकालाच असतं येथे स्वत:चं स्वतंत्र व्यक्तित्व!
करा आदर एकमेकांचा निर्माण करून स्वतःचे अस्तित्व!!
अधूनमधून छोटे मोठे उत्सव ,आनंदाचे क्षण
करा साजरे!
करा खर्च वेळ ,पैसा प्रत्येकासाठी ठेवून बाजूला कामकाज रे!!एकवेळचे जेवण कमीत कमी .
करा सर्वांसोबत बसून!
टिव्ही ,मोबाइल ठेवा दूर गप्पा गोष्टी करा जरा हसून!!
घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागायचं!
म्हणून का सदा फटकळपणानंच वागायचं?!!
आज जर दिलात कुटुंबासाठी तुम्ही योग्य वेळ!
वृद्धपणी घरातून बाहेर पडण्याची येणार नाही वेळ!!
लहांनथोरांनाही घरातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांत मत मांडायला द्या वाव!
ते ही योग्य मत सांगू शकतील त्याच्या वैचारिक क्षमतेस जर का मिळेल वाव!
