STORYMIRROR

Yogesh Nikam

Romance

3  

Yogesh Nikam

Romance

दूर

दूर

1 min
129

मला कुठे तुझ्यापासून दूर जायचे आहे

मला तुझ्या प्रेमाच्या सहवासात रहायचे आहे

मला तुझ्या आठवणीत जगायचे आहे

मला तुझ्यावर येणारे दुःख झेलायचे आहे..!!


मला कुठे तुझ्यापासून दूर जायचे आहे

मला फक्त तुला सुखात बघायचे आहे

मला तुला मनमुराद हसवायचे आहे

मला तुझ्या मनांत रहायचे आहे...!!!


मला कुठे तुझ्यापासून दूर जायचे आहे

मला तुझ्या स्वप्नांत रंगायचे आहे

मला तुला डोळे भरुन बघायचे आहे

मला तुझ्यासोबत हातात हात घेवून फिरायचे आहे...!!!


मला कुठे तुझ्यापासून दूर जायचे आहे

मला तुझ्या हदयात रहायचे आहे

मला तुझ्या प्रेमाच्या दुनियेत रहायचे आहे

मला फक्त आणि फक्त तुझ्यासोबत जगायचं आहे...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance