दुष्काळाचा तडाखा
दुष्काळाचा तडाखा
पिण्याच्या पाण्याचा अभाव
जनावरांची जीवनासाठी धडपड
मनुष्यही भटकत आहे
शोधत जलाशयाचा तळ
थकला शोधून प्रत्येक जीव पण
पाण्याचा लवलेशही नाही सापडला
पाण्याच्या एक - एक थेंबासम
अश्रुही आपसूक गोठून गेला
जमीनीवरच्या कोरडया भेगा
हृदयात खोलवर रुतल्या
पाना - फुलांचा पाचोळा चोहीकडे उडाला
हिरव्यागार सृष्टीचा रंग काळाकुट्ट पडला
पक्षीही आपली घरटे सोडून निघाला
दुष्काळापुढे सगळ्यांनी अहं भाव त्यागला
दुष्काळाचा तडाखा काही सहन होईना
होतकरू शेतकरी सुद्धा या प्रसंगात हरला
आता तरी हजेरी लाव रे पावसा
बघ , कित्येकांच्या हाडांचा सापळा झाला
