STORYMIRROR

Nalanda Satish

Tragedy

3  

Nalanda Satish

Tragedy

दुष्काळा एक मोठी समस्या

दुष्काळा एक मोठी समस्या

1 min
230


कसा घातला दुष्काळानं घाट

झालं रिकामं धरणीचं पोट

स्रोत आटले पाण्याचे सगळे

कसा जाईल पाण्याचा घोट


निर्सगाच्या ग्रहनाला

आपणचं कारणीभूत

उपसा केला निसर्गाचा

भोगावे कर्माचे भभूत


दुष्काळाचे चटके

अख्खा प्राणिमात्र सोसतो

थेंबा थेंबा सोबत पाण्याचा

आपल्या रक्ताला आटवतो


जमिनीच्या भेगा घनदाट

काळजापर्यंत पोहोचल्या

अश्रू झाले कोरडवाहू

धारा घामाच्या वाहल्या


मुका झाला पशुपक्ष्यांच्या गोंगाट

भकास झालं शिवार ओसाड मोकाट

फोडती हंबरडा गाईम्हशी रानात

दुष्काळाने घेतला उभ्या जीवांचा घोट


एक माणूस एक झाडं असावं ब्रीदवाक्य

सुई हीच फाटकं आभाळ शिवण्याची

फोडतील मग ढग आभाळाला पान्हा

जपू हिरवळ वाढवू पातळी पाण्याची


दुष्काळ आहे मोठी समस्या

निसर्ग निर्मित असो वा मनुष्य निर्मित

दोन्हींचे निवारण आपल्याच हाती

पर्यावणाला करून संतुलित


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy