दुष्काळ
दुष्काळ
दुष्काळ म्हणजे काय
प्रश्न पडला माझ्या मनी
कुणी देईल का याचे उत्तर
या अजाणत्या मनी
दुष्काळ म्हणजे एक ग्रहण
जिथे पसरतो पूर्ण अंधकार
करपून गेले पूर्ण नशिब ज्याचे
दुष्काळाचे चटके देती हाहाकार
नदीतील पाणी आटता
शेतकऱ्याचे रक्त ही आटले
गरमीने रखरखणारे मोकळे आभाळ
पोरांच्या डोळ्यात अश्रु दाटले
पावसाच्या थेंबासाठी तरसणारा मातीचा कण
कर्जाच्या उंबरठ्यावर येऊन आत्महत्येकडे वळाले मन
फाटके आभाळ ओसाड धरती
न सापडे अन्नाचा कण
याला थांबण्यासाठी आपणच पाऊल उचलायचं
त्याच्य सुख दुःख वाटून घ्यायचं
कणभर साठवून थेंबभर जिरवून
निसर्गाला दुष्काळापासून वाचवायचं
