दुष्काळ एक समस्या....
दुष्काळ एक समस्या....
पाऊस पडेना काही लागेना हाती
कोरडी झाली आहे माझी काळी माती....
आभाळाकडे लागले माझे डोळे
रान माझे काळे दिसे आकाश निळे
कसं करू भरुन आली माझी छाती....
कधी होतं माझं हिरवं शेतं
आज दिसते मला ही काळी रेतं
पाऊसाची का तुटली जमिनीशी नाती....
जीवनाचा अवघड होईल प्रवास
मातीने का करावा कोरडा उपवास
झाडे लावा पेटतीलं सुखाच्या वाती....
जगाचं अवलंबून पावसावर जीवन
वाट पाहतो कधी बरसेल हा सावन
सारे हो दुखाची किती गाणी गाती....
