दुष्काळ एक मोठी समस्या
दुष्काळ एक मोठी समस्या
हल्ली दुष्काळ भोवतो
कधी ओला तर सुखा..
काल चक्र जीव घेणे
अंदाज लावणार तरी कसा ?
मरण होते फक्त शेतकऱ्याचे
काय करावे आणि कुठे जावे त्याने ?
कर्ज काढून शेतरान माळतो
पिक मात्र दुष्काळ खाते..
घरादाराची दैना
त्यातील माणसांना भोवते..
कुठे कुणी लग्नाचं राहते..
कुठे कुणी शिक्षणंच सोडते..
तर कधी परिस्थितीशी हारुन
कुणी बाजारातील हौसेची
वस्तू होऊन पलंगावर भंगते..
फक्त येतो वाट्याला शोषणाचा
अकल्पित हा श्राप !
त्यात कुणी कंटाळून आत्महत्या करतं..
या गोरगरीबांनी काय करावे..
डोळे पुसत पुन्हा उभे राहवे ?
या उदासीन जगाला सलाम करावा..
आणि म्हणावे तुम्ही खुश तर आहे ना !
मग वाटतं रे देवा !
का हे को दुनिया बनाई..
का हे को दुनिया बनाई...
