दुःख
दुःख
लोकांना त्रास देण्यात
कोणाला आनंद वाटतो
लोकांना आनंदी करण्यास
मला त्रास घ्यावा वाटतो।।
दुःख सांगून दूर होते
हा तर चक्क गैरसमज
दुःखावर मीठ चोळणारे
अनेक हाच पक्का समज।।
आयुष्यात दुःख वाटणारे
लाखो लोक येथे भेटतील
कारण नसतांना सज्जनास
मुज्जोरी करून खेटतील।।
दुःखाचा बाजार मांडणारे
बाज़ारबुणगे मी पाहीले
ढोंगी गळा फाडून रडणारे
चमचे तेवढे मागे राहीले।।
दुःखीताचे अश्रू पूसणारे
सच्चे फार कमी असतात
टाळूवरचे लोणी खाणारे
हरामी मात्र कमी नसतात।।
दुःख आपले असते हेच
अनेकांना नसते समजत
दुःखाला नसते बसायचे
कवटाळून हेच नसते उमजत।।
