STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational Others

दुग्धशर्करा योग

दुग्धशर्करा योग

1 min
1.1K

थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती कै. डॉ.अे.पी.जे.अब्दुल कलाम!

वाचन प्रेरणा दिनी स्मृतीला तुमच्या त्रिवार करू सलाम!!१


रामायण, महाभारत, शाकुंतल, ग्रंथ ज्ञानेश्वरी!

सदैव राहोत वाचन संस्कृतीची धरोहर खरी!!२


बायबल, गुरू ग्रंथसाहेब वा असो हॅम्लेट!

मृत्युंजय,स्वामी, ययाती, मेघदूत, नटसम्राट!!३


खांडेकर, शिरवाडर, कानेटकर व गडकरी!

शेक्सपियर, रूसो, वर्डस्वर्थ नावे कितीतरी!!४


ओलंडूनी सीमा धर्म, भाषा, देश, प्रांतांच्या!

करूनी घेऊ अवगत उच्चकृती ज्ञानवंतांच्या!!५


अनुभवा सवे ज्ञान देता ग्रंथ होती आपले गुरु!

वाचन केल्याने सद्ग्रंथांचे शिक्षण रहाते सुरू!!६


वाचन ही एक सोपी सहज साध्य कला!

सरावाने होतो पारंगत त्यात ज्ञानी भला!!७


वाचन संस्कृती जपते एक संपन्न वारसा!

लाभे जयाने व्यक्तिमत्वाला सुंदर आरसा!!८


वाचाल तरच वाचाल नाही उगाच म्हणत!

जगा आत्मविश्वासाने नका राहू कण्हत!!९


वाचन प्रेरणा दिन कोजागिरी दुग्ध शर्करा योग!

ज्ञानामृत प्राशन व जागरणाचा करून संयोग!!१०


ग्रथांच्या गगनी घेतली ज्ञानपंखांनी जर भरारी !

राहू वाचत तरच दिसेल लक्ष्मीसह सरस्वती दारी!!११


काही वर्षांपूर्वी वाचन प्रेरणा दिन ( माजी राष्ट्रपती, भारतरत्न कै.डा.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन)

व कोजागिरी पौर्णिमा ही एकाच दिवशी आली तेव्हा सहजपणे सुचलेले हे काव्य.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational