दुभंगले घर
दुभंगले घर
दुभंगलेल्या भिंती...
दुभंगलेल्या मनाच्या...
गाथा सांगू किती....
राजस मुखडा शोभून दिसे...
असा होता एक पुत्र....
नाव, लौकिक, किर्ती मोठी
पसरली ख्याती सर्वत्र....
वाटे हवाहवासा प्रियजन होते चिकार...
आई-बाबाचा होता एकुलता एकच आधार...
नियतीने कोप असा केला...
दैवाने नशिबाचा खेळ मांडला...
डाव बघा संसाराचा अर्ध्यावरी मोडला...
एकुलता एक पुत्र तो धारातीर्थी पडला...
दुभंगलेल्या घराच्या भिंती येतात उभारायला...
पण दुभंगलेल्या कुटुंबाला कोण येते हो सावरायला...
दुभंगलेल्या घरात असतील सारे एकत्र...
तर नांदू शकतात सुखानं सर्वत्र...
पण तेच नसतील सोबत तर सगळं होतं विचित्र...
