दोनच शब्द!
दोनच शब्द!
दोनच शब्दांची
कविता मला लिहावी वाटली
विचार करता करता
पूरती फाटली
तोकडेपणा
प्रकर्षाने जाणवला
जीव माझा
अर्धमेला झाला
म्हंटले किती हे
महाभयंकर अज्ञान
असूनी सुशिक्षित
अपुरे सज्ञान
शेवटी मग मात्र
त्रागा करायचे सोडले
आणि शब्दांच्या दुनियेत
पाऊल पडले
शोधता शोधता
दोन शब्द सापडले
माझे डोळे उघडले
मन सज्ञानी झाले
अंतरी ज्ञानाची ज्योत पेटता
कळले इस्पित या जीवनाचे
मोल जाणता दोन शब्दांचे
जे होते "पूर्ण ज्ञान" सर्वस्वाचे....!
