दोन मोती , शिंपल्यामध्ये वाढले
दोन मोती , शिंपल्यामध्ये वाढले
दोन मोती
दूर दूर शिंपल्यामध्ये वाढले
लाटांसंगे वाहात वाहात
एकाच प्रवाहात आले
अग्रीम प्रीतिसंगम तो,
समुद्रतटावरचा
भेटताच क्षणी आकंठ प्रेमात बुडाले
आतुर दोघेही मिलनास
दुर्दैव त्यांचे , शिंपले मध्ये आले
किनारी विसावुनी शेजारी
दोघे जीव कासावीस
शिंपल्यात बंदिस्त
करुणा भाकती देवासी
होण्यास शिंपला उध्वस्त
व्हावे एकदाचे मिलन
एकाच माळेमध्ये
असेच गुंफून राहावे
एकमेकांस पाहावे अहोरात्र
घर्षणाने झीज व्हावी
कणाकणात मिसळावे एकत्र
