दोन किनारे
दोन किनारे
दोन किनारे आपण दोघे
वेळ अशी का आली?
वाळूवरची प्रेमकहाणी
लाटेने त्या वाहून नेली।। १।।
ठावठिकाणा माझ्या मनाचा
आता नाही उरला
तुझ्या आठवांच्या क्षणांनी
रातीसंगे दिवसही सरला।। २।।
रातराणीचा सुंगध घेऊनी
दरवळल्या चांदणराती
भास तुझा मज सतावतो
खुणावते आपुली प्रिती।। ३।।
डबडबलेल्या डोळ्यांमध्ये
तुझीच स्वप्ने साठवली
आज आसवांच्या वाटेने
क्षणात सारी वाहून गेली।। ४।।