दलदल
दलदल


अभिमान आम्हा देशाचा
कारखानदारी उच्चपदावर
कौतुक मोठे सांगतो त्याचे
प्रदूषण वाढतेय काही विचार...
विचाराअभावी नियोजन
ठरते माणुसकीस घातक
हवा, पाणी नासले तयाने
जीव धोक्यात होतंय खाक
जालीय जीवन गुदमरतेय
श्वास आत घुसमटतोय
चिंता सतावतेय दिन रात
तोडगा हवा नको गैरसोय
मलिन पाणी नदीतले
दूषित जीवन माणसाचे
पिण्याजोगे न उरले आता
प्रयत्न पुन्हा स्वच्छतेचे