दिवस तिसरा नवरात्रीचा
दिवस तिसरा नवरात्रीचा


अश्विन शुद्ध तृतिया
दिवस तिसरा आज
चंद्रघटा मातेची
विधिवत पुजा करता
होते कांती गुणांची वाढ
चंद्रघटा देविचे महत्व असे आज
तिस-या शक्तीचे या
नाव असे चंद्रघटा
शांतीदायक, कल्याणकारी
रूप असे तिचे
तिच्या उपासनेने
भय दुर होते
अर्धचंद्र कपाळावरी
चंद्रघटा नाव तीचे
सिंहावर आरूढ आहे
दशभुजांची ही देवी
त्रिशुल, कमंडलू, गदा, तलवार
चार हातांमध्ये जीच्या
अभयमुद्रा असे पाचव्या हातात
शस्त्र, अस्त्र धारण
देविची ही युद्ध मुद्रा
ब्रम्हा, विष्णू, महेशाच्या मुखउर्जेतुन
भक्तजनांच्या कल्याणा
अवतरली माता भगवती चंद्रघटा