STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy

दिवस आजचा काळा...

दिवस आजचा काळा...

1 min
397

दिवस आजचा काळा

जर का उगवलाच नसता,

तर माझा अण्णाभाऊ

भारतरत्न झाला असता


साहित्यरत्न ही ओळख अण्णाची

लेखणी खरी ती तलवार त्यांची

होती खरी त्यांना चीड अन्यायाची

जगात किर्ती महान या शाहीराची

असा कादंबरीकार, कथाकार, गीतकार, नाटककार, लोकशाहीर सोडून गेला नसता...


चित्रपटसृष्टीत अण्णा हिरो खरा असता

निर्माता, दिग्दर्शक

महान अभिनेता

साऱ्या जगात, विद्यापीठात

असत्या अण्णांच्या कादंबऱ्या ,कथा

अचंबित सारं ती पाहून विद्वत्ता...


दिड दिवसाचं शिक्षण

साऱ्या जगाचं अनमोल ज्ञान

साऱ्या जगात आदर्श महान

हे एक नंबरी सोनं

साऱ्या जगात प्रकाश या ताऱ्याचाच असता...


असता कामगारांचा न्याय

नसता मुळीच अन्याय,

समतेचा रोऊन पाय

दूर झाले असते सर्व भय

सर्व जगात अण्णांचाच बोलबाला झाला असता...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy