दिवाळी सण
दिवाळी सण
आपल्या सर्वांचा दिवाळी हा सण
देतो लहानपणीची आठवण
दिवे, पणती,रांगोळी दारात
सरविकडे रोषणाई घराघरात
फटाक्यांसाठी हा माझा चाललेला अट्टाहास
दिवाळीला बाबांनी पुरवला खास
सकाळ सकाळी सर्व मित्रांसोबत
सुळसुळे, लवंगी, सुतळी बार वाजवी अंगणात
फुटकी कवडी नसतानाही बाबांच्या किशात
चकली, चिवडा, शंकरपाळ्या फरार आमच्या मुखात
दिवसभर घाम गाळून
पुरवली आमची हौस भरभरून
आयुष्यभर जुने कपडे तुमच्या अंगात
मात्र नव नवीन कपडे आम्हाला दिलात
पहिल्यासारखी दिवाळी वाटते कुठे
आता लाड पुरवायला बाबाच आहेत कुठे
दरवर्षी दिवाळीच्या उत्सवात
ह्या आनंदी क्षणी डोळे पाझरतात
