STORYMIRROR

Rutuja kulkarni

Abstract Others

3  

Rutuja kulkarni

Abstract Others

दिवा

दिवा

1 min
270

मावळतीच्या छटा घेऊन, नभ उतरू लागतो,

गर्द तो काळोख चोहीकडे पसरत जातो.

अशा या काळोखाला,

तो मंद प्रकाश छेदून जातो.

सांजवेळी एक दिवा, तुळशीपाशी तेवत राहतो.

वार्‍याच्या लकेरीसवे खेळण्याची,

त्याची खोड चं असते.

स्वतः जळत उभा राहून,

सार्‍या जगाला उजळवण्याची, त्याची सवय च असते.

त्याच्या सोबतीने अंगणातली,

ती तुळस ही अशी मोहरून येते,

सांजवेळी दिवा लावता तिजपाशी,

अंगणाला खरी शोभा येते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract