दिशाहीन झाली नौका
दिशाहीन झाली नौका
दिशाहीन झाली नौका शोधते किनारा... शोधते किनारा
जलातून उठल्या लाटा
कुणी दाविल्या का वाटा
मधे कुणी विरल्या कोणा
लाभतो किनारा, शोधते किनारा
दिशाहीन झाली नौका शोधते किनारा....
नभातून आल्या धारा
कुणा ओंजळीचा थारा
बने कुणी मोती कोणा
मातीचा सहारा, शोधते किनारा
दिशाहीन झाली नौका शोधते किनारा....
तरूवरी फुलली सुमने
कुणी माळली प्रीतीने
कुणी प्रभू चरणी कोणा
कोठीचा निवारा, शोधते किनारा
दिशाहीन झाली नौका शोधते किनारा....
