STORYMIRROR

Anupama TawarRokade

Inspirational

4  

Anupama TawarRokade

Inspirational

दिपोत्सव

दिपोत्सव

1 min
321

कुंभाराची किमया ही

देई मातीस आकार 

दिप छोटासा उजळे

प्रकाशित जग सारं

 

दिवा मातीचा साकार

वात कपाशीची असे

तेल देई त्यास साथ

दिप उजळता दिसे


दिवा वातीस उपमा

जिवलगा देत असे

माने प्रेमाचे प्रतिक

सुख दु:ख जाणतसे


दिप प्रतिक दिशेचे

दर्शविते योग्य दिशा

सकारात्मकता मिळो

दिप उजळते आशा


दिप लावून करूया 

अंधकार संपण्यास

एक एक दिप देई

बळ एकीचे जगास


दिप माळ रोशनाई

आनंदाचे हो प्रतिक

दिपोत्सव हा साजरा

करू सारे जागतिक


येवो महामारी किंवा

येवो संकटे अनेक

दिप लावता एकीचा

लढू सारे होऊ एक


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational