STORYMIRROR

Umakant Kale

Tragedy

4  

Umakant Kale

Tragedy

दिन काळा ऐतिहासिक

दिन काळा ऐतिहासिक

1 min
149

खूप झाले अन्याय रे

नाही आता सहणार

दडपशाही मोडून

सत्ता ती बदलणार


एल्गार तो क्रांतीचा 

मनी प्रत्येकाच्या झाला

पेट घेऊनी त्या ज्वाला

जनसमूह तो आला


जालियनवाला बाग

टसाटस हो भरली

उद्रेकाची जणू आग

डोळ्यात मग दिसली


धाबेही दणदणाले 

त्या ब्रिटिश सरकारचे

वाटे नाही काही खरे

दिन हे परतण्याचे


मोडून काढू उठाव

झाली घेराबंदी अशी  

चौफेर घेरले त्यांनी

नाही उरे जागा अशी


वर्षाव गोळ्यांचा झाला

धावपळ ती उडाली

जीव घेऊन मुठीत

सैरभैर सारी ती धावली


काही विहिरीत घेई

उडी, जीव वाचेल हो

काही ती गोळी खाऊन 

कुठे कोण वाचला हो


पाणी लाल रंगी दिसे

अस्ताव्यस्त देह सारे

देशासाठी प्राण दिले

वीर होते असे सारे


दिन काळा इतिहास

नाही मिटल्या हो गेला

खूणा ऐतिहासिक रे

जमा जालियनवाला


आठवून आजही रे

भरते डोळ्यात पाणी

नाही विसरणार रे

होते रक्त नाही पाणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy