दिलासा...
दिलासा...
1 min
115
आलास आज आहे तू थांब ना जरा
बोलून घे मनाचे होऊन बावरा
हो पाळला जरासा मी हट्ट मानते
थकल्या वयात वाटे भेटेल आसरा
भारावली तुझ्यावर माझीच चूक ती
प्रेमात आसवांचा हा लाभला झरा
जखडून बंधनांनी कित्येक राहीली
पाहून तृप्त झाली मी आज चेहरा
छळतो तरी किती रे एकांत सारखा
आता जरा दिलासा मज लाभला खरा