दीपावली
दीपावली
सुरू होते नवे पर्व
नव्या आशा जागवीत
सण येतो एक खास
दीपावली सजवीत
नरकचतुर्थी दिनी
होई अभ्यंगस्नान हे
तेल, उठणे सर्वत्र
सुगंधित करू पाहे
फुलं माळा सजवुनी
होते लक्ष्मीचे पूजन
आगमन होता तिचे
प्रफुल्लित होते मन
पाडव्याच्या मुहूर्ताला
जन खरेदी करिती
धनी देई ओवाळणी
भार्या घास भरवती
भाऊबीज दिनी भावा
ओवाळते बहीण ही
महागड्या भेटवस्तू
मनी अपेक्षाच नाही
