ध्येयवेडा एक गुरूजी
ध्येयवेडा एक गुरूजी
ध्येयवेडा एक गुरूजी
नाव त्यांचे डिसले
क्यू.आर.कोडचा
लावून शोध जगात दिसले...!!
भारताचा बहुमान
जगात उंचावली मान
पुन्हा एकदा जि.प.शाळेचा
जगात वाढला बहुमान....!!
संवाद साधला बाह्य देशांशी
स्मार्टच घडविली पिढी
नऊ वर्षांच्या कारकिर्दीत
चढली उंच यशाची शिढी...!!
कौतुक करायला पडती
आज शब्द माझे तोकडे
केवढा मोठा निर्णय तुमचा
वाटून टाकले सर्व रोकडे (रूपये)...!!
संस्कार छान घडलेत तुमच्यावर
तुमच्या उदार मनानं दाखवून दिले
महाराष्ट्राचेच नाहीत तर अख्खा
भारताचे नाव जगात पुढे नेले....!!
धन्य ती आई डिसले गुरूजींची
जिच्या कुशीत रणजित गुरू जन्मले
ग्रामिण भागातले ग्लोबल टीचर
केवढे मोठे भाग्य लाभले....!!
डिसले बंधुच्या कर्तृत्वाचा
मज सार्थ अभिमान आहे
डिसले बंधु आम्हां सर्व
भारतीयांची शान आहे.....!!
अडचणीवर मात करत
लावला तुम्ही नवीन शोध
कमी नका समजू शिक्षकांना
घ्यावा आता सर्वांनी बोध....!!
कर्तृत्व तुमचे थोर बंधु
कार्याला तुमच्या करिते वंदन
तुमच्यामुळे उंचावली मान
डिसले बंधुचे मनापासून अभिनंदन....!!
