ध्यास संविधान 🙏
ध्यास संविधान 🙏
आई देते श्वास संविधान देतं,मुक्तपणे जगण्याचा ध्यास.
सुरू होतो विद्रोह,आतल्या आत पाहून अन्याय,अराजक,कुरघोडी जातीयता,विषमता.
आणि मानमानसातली विचारांची,दरी आणि समजु लागतो फरक प्राणी,
आणि मानसातला, जेव्हा माणूस डोकावतो संविधानाच्या आत तेव्हा कळतं
आपण माणूस म्हणून वेगळे आहोत बाकी श्वास तर जनावरही पण घेतातच की!
पाहून,आंधळ होणं,ऐकून बहिर होण,सोसून सहन करण
सोसतचं, रहाणं,अंतरमनाला न पटणारे पटवून घेणं,
दबलेला आवाज आणि घुसमटलेला श्वास मोकळा होतो
जेव्हा माणूस डोकावतो संविधानाच्या आत.
बाकी मनं मेलेल्या चेहरयांचीही हदयाची धडधड सुरूच असते की!
हे असे का? प्रश्न पडायला लागतात.अन्न वस्र निवारया ईतकीच
शिक्षणाची गरज मौल्यवान वाटते. विशमतेची कारण जाणून घेण्याची उत्सुकता दाटते
खाली घातलेली मान जुलमाशी भिडते.
असत्याची चीढ आणि सत्याची भीती वाटत नाही.
मी गूलाम नाही हा विश्वास माणूस मनात जागावतो,
जेव्हा माणूस संविधानात डोकावतो.
बाकी चार भींतीच्या आत आजुनही श्वास गुदमरतात की!
अज्ञानात अंधार आहे. शिक्षणात प्रकाश आहे.
ताठ मानेने जगणं हा प्रत्येक मनुष्याचा अधिकार आहे.
आणि संविधान पीडयानपीडया खितपत पडलेल्या तळागाळातील,
शेवटच्या माणसांपर्यंत न्याय पोहोचविण्याच हुकमी हत्यार आहे.
वर्ण आणि जातीं व्यवस्थेचे मुखवटे ऊतरविणारी तळपती तलवार आहे.
हे समजून जातो जेव्हा माणूस संविधानात डोकावतो.
बाकी पोथीपुरानं तर मानसात दडलेल्या पंशूना हजारो वर्षांपासून पोसतात की !
