STORYMIRROR

Dipali patil

Tragedy

3  

Dipali patil

Tragedy

धुरळा

धुरळा

1 min
11.8K

काळा करडा धुरळा नुसता धुरच धूर... 

वाहतोय सारीकडे दूरच दूर..... 


जागतिकारणाचा फटका हा 

अमानुष खेळ आपणच पहा.... 


पैसा,हव्यास, प्रगती काय नि काय?

कारणे अनेक आम्हाला नाडताय.. 


विषाणूची महामारी ठरली मारक 

काही समय होईना आहे तारक... 


विसावला प्रदूषणाचा हाहाकार क्षण 

हलके जाहले छातीवरचे दडपण... 


निर्मळ स्वच्छ श्वास घेतोय आपण 

हवा झालीय खेळती परी जड मन.. 


कोरोनाचा कहर सुरूच जगभर 

कारणे फक्त वेगळी संकटे आहेतच माणसांवर... 


पर्यावरणाचा ढासळतोय समतोल हे खरे 

आपणच शोधणार त्यावरचे उत्तरे, त्यावरचे  उत्तरे.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy