धुक्याची चादर...
धुक्याची चादर...
धुक्याची चादर,आकाशाने ओढली,
भरली हुडहुडी,थंडी आता वाजली
धुक्याची चादर,त्रास सकाळ सकाळी,
डोळे उगीच ताणता,बसताे अश्रु ढाळी
धुक्याची चादर, हळूहळू कमी हाेते,
सूर्य उगवताच, क्षणाक्षणाने नाहीशी हाेते
धुक्याची चादर, अनुभव असताे खास,
धुक्याच्या रूपाने दरवळतो, ईश्वरी शक्तीचा वास
