धरणीची भाऊबीज
धरणीची भाऊबीज
न्हाहून पहाटे पहाटे
हिरवा शालू नेसली
चंद्र- सूर्य ओवळण्यास
धरणी बहिण आतुरली.
चंद्र गोंडस धाकटा
भाऊ आहे लाडका
भेटीच्या ओढीने तोही
गोड बोल त्याचे ऐका.
पाडेल शुभ्र प्रकाश
चांदण्यात बसतो नटून
ओवाळणी करण्या
येणार नटून -थाटून.
एक भाऊ तीचा
पहाटेच सुंदर प्रकटला
सोनेरी किरणांचा आनंद
तिच्या ओटीत घातला.
ऊब देतो मायेची
खुश करण्या बहिणीला
सांज होताच मग
जातो आपल्या गावाला.
या दोन्ही भावांची
आहे बहिण एकटी
भाऊबीज ही उजाडली
धरणी बहीण आहे धाकटी.
