STORYMIRROR

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

3  

मैथिली कुलकर्णी

Inspirational Others

धरणी माय

धरणी माय

1 min
257

लेकीचं लग्न तोंडावर

डोंगरएवढं कर्ज माथी....

काय अन कसं करावं?

संपेना ही साडेसाती ।।


धरणी माय विनावतो

कृपादृष्टी दाव जरा...

हंगाम हा पिकू दे

होतोय ग कोंडमारा ।।


दिस सारा जातो माझा

पोटासाठी राबण्यात...

रक्ताचे पाणी करतो

राब राबूनी रानात ।।


काटे कीती रुतले पायी

पर्वा न्हाई त्याची....

सोसले जे चीज व्हावे

वाट ही पावसाची ।।


पिकूदे एवढे यंदाचे साल

गळफासाचा विसर पडावा

माझ्या सह बांधवांचा 

सातबारा कोरा व्हावा ।।


बळीराजा मी भाबडा

सोसून दुःख झटतो खरा

"धारणी माय"तूच माझ्या

आयुष्याचा आसरा ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational