STORYMIRROR

Kavita Sachin Rohane

Action Inspirational

3  

Kavita Sachin Rohane

Action Inspirational

धन्य तो भिडेवाडा

धन्य तो भिडेवाडा

1 min
10

धन्य तो भिडेवाडा..

धन्य तो भिडेवाडा

ज्याने स्त्री शिक्षणाची सुरुवात केली..

असाक्षरतेचा कलंक मिटवूनी ज्ञानाची शिदोरी महीलांना दिली..

बघायला गेलं तर होता तो एक वाड्यासारखाच वाडा..

 पण मुलींसाठी बनला तो त्यांची शाळा..

काळ होता तो खरं पुरुषप्रधान पण मिळून दिला त्याने स्त्रीला त्यांचा खरा मान..

सावित्री मायीने कमालच केली ज्ञानाची शिदोरी प्रत्येक स्त्रीला दिली..

सहन केले तिने शेण आणि दगडांचे गोळे 

पण ज्ञानदानाचे काम तिने निरंतर केले..

स्त्री काय करू शकते हे तिने दाखवून दिलं

कर्तुत्वाने स्वतःच्या सगळ्यांचं मन तिने जिंकलं..

स्त्रियांना मिळणाऱ्या मानसन्मानात आहे भिडे वाड्याचा मोलाचा वाटा

माननीय सावित्रीबाईंनी दिला स्त्रीला मोठा ज्ञानाचा साठा..

भिडे वाडा अजय अमर असावा असं प्रत्येकालाच वाटतं 

पण आज त्याची अवस्था बघून डोळ्यात पाणी साठत..

भिडे वाडा म्हणजे ध्यान दानाची एक साठवण सावित्रीबाईंच्या पुण्याईची येथे खुप आठवण..

प्रत्येक स्त्रीच्या मनात भिडे वाड्याबद्दल आहे खूप आदर

 अन् प्रत्येक व्यक्ती ज्यांनी स्त्री शिक्षणास सुरुवात केली त्यांना आहे शत् शत् प्रणाम सादर..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action