STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

धावणे

धावणे

1 min
196

माणसं सध्या धावतात खूप, कुठेच नाही पोहचत,

पळनं हे बनलंय साध्य, 

विचारांची दिशा नाही मिळत... 


वेगाच्या नादात नियंत्रण सुटतं, 

ताबा हरवून प्रवास सैरभैर होतो

आपलं जीवन शांतपणे अनुभवा,

क्रिया तशी प्रतिक्रिया घडवत राहतो


शॉर्टकटने मिळवलेले यश मोठेपणा, 

नाही टिकत चिरकाल, 

नुसतंच उंचीवर जाणं नको,

उंची टिकवता आली पाहिजे सर्वकाल...


तुम्ही किती धावता, यापेक्षा कुठे थांबता,

यश तिथेच थांबलेलं हे कळलं पाहिजे आता.. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics