धाव धाव अंबाबाई
धाव धाव अंबाबाई
1 min
277
धाव धाव अंबाबाई
धाव आता झडकरी
वेध घ्यावा कोरोनाचा
विनविते गं मी आई (1)
किती निष्पाप जीवांचे
बळी ह्याने घेतलेसे
झाली कुटुंबे उजाड
वध करी सत्वरसे (2)
दुष्ट संहारक दुर्गा
दानवांचा केला वध
आता ह्याचि आसुराचा
त्रिशूळाने करी वध (3)
माया तुझी अपारचि
पावतेस तू भक्तांसी
अष्टमीस सत्वरचि
मार ह्याचि कोरोनासी (4)
तुझी कृपा आम्हां लाभो
आशिर्वच अखंडचि
सुखानंद सर्वां लाभो
दुर्गा भक्त तारकचि (5)