धारणीमाता
धारणीमाता
डोंगर दऱ्यांनी धरती सजली
जमिनीवर गवताची मखमल रुजली
गात गाणे आनंदाचे वाऱ्यानेही झेप घेतली
नवतारुण्याच्या हिरवळीने वसुंधरा फुलली
साजिरी दिसे ही धरणीमाता हिरवा शालू पांघरलेली!!
धरणीलाही संभ्रमात टाकणारी प्रगती दुनियेत झाली
सिमेंट कोंकरेटच्या जगाने हिरवळीवर मात केली
उभे राहिले बिल्डिंग आणि टॉवर्स माती मात्र नाहीशी झाली
सजलेल्या धर्तीच्या मनात मग वृक्षतोडीची चिंता जागृत झाली
आडोसा दिला इमारतीने ,झाडाने दिली हक्काची सावली
साजिरी दिसे धरणीमाता हिरवा शालू पांघरलेली!!
कोरडी झाली नदी,आणि मातीची धूप झाली
यातही धारणीने समाधान मानून तृष्णा मनुष्याची शांत तिने केली
भूक मानवाची भागवताना निसर्गाची मात्र हानी झाली
याच उपकाराची परतफेड करण्याची योग्य वेळ ही आली
वृक्षारोपणाच्या मदतीने धारणीमाता प्रफुल्लित झाली
समृद्ध झाली माता मग वृक्षांच्या छायेखाली
साजिरी दिसे धारणीमाता हिरवा शालू पांघरलेली!!
साजिरी दिसे धारणीमाता हिरवा शालू पांघरलेली!!