देवगड हापूस
देवगड हापूस
देवगड हापूस यावर्षी
मार्केट मध्ये इतका विकला
देवगडवाले टेन्शन मध्ये
की इतका कधी पिकला || 0 ||
दक्षिण चा आंबा देवगड बनला
सर्वत्र देवगड च्या पाट्याच पाट्या
खरा आंबा ओळखावा कसा
व्यापाऱ्यांच्या कपाळाला पडल्या आट्या
हापूस समोर कधीच
इतर आंबा नाही टिकला
देवगडवाले टेन्शन मध्ये
की इतका कधी पिकला || 1 ||
