STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

देवा उपकार

देवा उपकार

1 min
547

देवा उपकार

किती तुझे थोर

नाही जिवा घोर

कशाचेही


देवा उपकार

मी कसे विसरू

तुझे नाम स्मरू

सदोदित


देवा उपकार

सर्व मला ठाव

मनी आहे भाव

अखंडित


देवा उपकार

असेच राहू दे

सदा तुझे वंदे

सुप्रभाती


देवा उपकार

म्हणून जगलो

काम तुझे केलो

जन्मभर


देवा उपकार

माझ्यावर एक

दृष्टी माझी नेक

अविरत


देवा उपकार

चिंता नाही काही

काळजी ही नाही

जीवनात


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational