देवा तुझ्यापाशी
देवा तुझ्यापाशी
देवा तुझ्यापाशी //आनंदाचा शोध
मनाला लाभतें // उत्सवात
बुद्धीला ज्ञानात //शांतता मिळते
अंतरीं भेटतं // निराकार
भक्तीचा आधार //घेऊन संसारी
जीवन चालतें // रुळावर
मायबापा पुढे // जग हे लहान
तया उपकार //दाखवले
बळा पेक्षा युक्ती //खरी देई मात
सिद्ध सिद्धेश्वरा //हे संस्कार
नम्र विनयात //प्रेमाची वाट
सुखासुखी नांदे //घरोघरी
आपुलकी पाया //वाढूनि मनातं
करतो एकत्र //आनंदात
तुज भक्ती संग //जग सारं डोल
नाचत झूमत //गाणं वाज
मनवे उत्सव //बाप्पा मोरया
बाप्पा मोरया रें //जय हो