देवा श्रीगणेशा...
देवा श्रीगणेशा...
गजानना गजवदना
विश्र्वरूप विनायका
सूक्ष्मरूपही विलसे
तू सृष्टीच्या चराचरा
भक्ती तुझी शक्ती देई
नाम तुझे तारून नेई
सगळ्यांसी उद्धारी
तूच ब्रम्हांडनायका
ध्यास तुझा चित्ती असे
आगमना मोद भरे
अति हर्षिती बहु सारे
मयुरेश्वरा तू मोरेश्वरा
देवा कृपेचा सागर असशी
सारी विघ्ने लयास नेशी
तुझिया चरणी मी लीन होतसे
येऊ दे करुणा दयाघना
©® निशा काळे