STORYMIRROR

Prem Gaikwad

Inspirational

3  

Prem Gaikwad

Inspirational

देव तरी पावतो कुठे...

देव तरी पावतो कुठे...

1 min
181

नाही पडला पाऊस

सरला अर्धा पावसाळा,

देव तरी पावतो कुठे

सांगा नवसाला...


करपून गेलं पिक

धारा लागल्या डोळयाला,

कोरडे आकाश

पूर आसवांचा आला.

  

शेतकरी कसा

पडला धरणीला

आकाशात ढग एक

दिसेना डोळ्याला..


काय होईल, कसे होईल

कोडे हे सुटेना,

दुष्काळ हटेना

जीव हवालदिल झाला..


पेरलेलं गेलं सारं

इलाज नाही कसला,

पाऊस हा रुसला

जीव झुरणीला लागला.


पाणी पाणी करून जाई

फुगटच जीव

कुठे आहे देव

मला दाखवा त्याला..


देवाला तरी कुणाची

दया कशाला येईल,

दुनिया बुडून जाईल

हा चमत्कारच झाला..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational