Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

देव गजानन!!

देव गजानन!!

1 min
393


देव गजानन , रुप मनोहर

येतसे दाटून , भक्तीस बहर //धृ//


विघ्नहर्ता तूच , तूच तारणारा

भक्ती पारखूनी , तूच पावणारा

डोळे लावूनीया , वाट पाहणार (1)


आनंदाचा कंद , देवा विनायका

मुखावरी स्मित , झळके तयाच्या

आज जाहलासे , भेटण्या आतुर (2)


षोडषोपचारे , भक्त पूजा करी

दुर्वा फुले हार , अर्पणही करी

मोदक नैवेद्य , केलासे तयार (3)


थैमान घालते , संकट रोगाचे

जीवही घेतले , किती निष्पापांचे

करुणासागर , कृपा भक्तांवर (4)


भक्तीभावे केले , पूजन आपुले

देवा सर्व गोड , मानूनीया घ्यावे

कृपावंत व्हावे , भोळ्या भक्तांवर (5)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract