देशभक्ती
देशभक्ती
देशप्रेम रक्तात भिनले
दिली आहुती शर्थींनी,
स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात
किती कष्ट सोसले वीरांनी..
सांडले थेंब लहूचे इतके
पावन झाली भारतभूमी,
पर्वा नव्हती स्वार्थाची त्यांस
फक्त मनी स्वातंत्र्याचीच हमी..
त्या हृदयांची किंमत स्मरू
शान, मान देशाची उंचावू,
राखूनी इज्जत तिरंग्याची
त्या वीरांना अंतरी सजवू...
उंच गगनी फडकत तिरंगा
त्या कष्टांची साक्ष देई,
ठेवूनी भान सदैव त्याचे
देशप्रेमाची स्फूर्ती येई...
प्राण त्यागून स्वातंत्र्य गोडी
चाखावयास ज्यांनी दिली,
कर्तव्यता आपली जाणूनी
त्या पराक्रमाची शान राखली..
हा देश माझा एकच भावना
अंतरी गड्या चल सजवू ,
देशास्तव उर्वरित क्षण सारे
आनंदाने आपण घालवू...
