देशाची शान...
देशाची शान...
देशाची शान
भारतीय संविधान,
समस्त भारतीयांचा
आहे ताे अभिमान...
देशाची शान
आहे सर्वोच्च कायदा,
पायाभूत संविधानाने
शासनव्यवस्थेचा वादा...
देशाची शान
राज्यघटनेचा स्वीकार,
कारभाराच्या तरतुदीचे
पडतात येथे हुंकार...
देशाची शान
भारतीय संविधान,
जगात उंचावली
या संविधानाने मान...
