STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

2  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

देशाचे सुपुत्र

देशाचे सुपुत्र

1 min
14K



भारत देश महान

आपला भारत देश महान

सुपुत्र आपण भारत देशाचे,

स्वप्न प्रगतीचे करू देशाचे

हरित क्रांती, सशस्त्र होण्याचे,

राष्ट्रीय, एकता, अखंडतेचे

धडे गिरवूया मानवतेचे

संदेश विश्व रक्षणाचे,

कर्तव्याचे भान ठेऊन

देश सदा बलवान करुन

मानव सेवा अखंड ठेवून

गरीबाला न्याय देऊन

देशातील तंटे सोडवून

शांतीचा संदेश देऊन

जगाला आदर्श दाखवू

भारत देश महान...


सर्व भारतीय एक होऊन

गीत प्रगतीचे गाऊन

ध्यास रक्षणाचा धरुन

अभिमान हृदयात धरून

संस्कृतीचा आदर करुन

मूल्ये देशाची करू जतन

तिरंगा ध्वज हाती घेऊन

प्रेरणा बालवीराना देऊ

भारत देश महान...


नव्या दमाचा, नव्या युगाचा

कर्तुत्वान युवा पिढीचा

आदर्श नागरिक घडविण्याचा

सुपुत्र असावा या देशाचा

भले करण्यास मानवतेचा

मदत सर्वाना करण्याचा

स्त्री पुरुष समानतेचा

जन्माचे सार्थक करण्याचा

गरीबी हटविण्यासाठी लढू

अंधश्रद्धा देशातून हटवू

चमत्काराची होळी करू

वाईट प्रथा जाळून टाकू

मानवाला मुक्त करू

वास्तवाचा स्वीकार करू

सत्यासाठी आग्रह धरु

मानवाला सतर्क करू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational