देणे
देणे
सुळसुळाट देणाऱ्यांचा
सुळसुळाट घेणाऱ्यांचा
सुळसुळाट 'मी'च्याच विश्वात राहणाऱ्यांचा
स्व च्या विश्वापलीकडले जग ओळखण्यास
ओळखावे लागते आजूबाजूचे जग
त्यांच्या गरजा व आपल्या गरजा
गरज माझी नसतांनाही
'देणे' दुसर्यांच्या गरजा लक्षात घेऊन करणे
ओळखता आले तर घे वसा 'देणे'चे
न मारता टिमक्या फोटो काढत
प्रदर्शन सामाजिक कार्य केल्याचे!!!