देहबोली
देहबोली
वेड लावूनी गेली मजला
बिन्धास्त तुझी ग देहबोली
पाहीलेल्या स्वप्नास तू
छेद उभा देऊन गेलीस
आशा पल्लवित झााल्या
हाकेस ओ देऊन गेलीस
पुन्हा भेट व्हावी म्हणूनी
खूण तू ठेवून गेलीस
बदल त्या रंगास तू
ढंग नवा देऊनी गेलीस
भेदरलेल्या या मनास
सांत्वना देऊन गेलीस
विस्कटलेल्या जीवनाला
साज नवा देऊन गेलीस
गीत जुने नाद जुना
संगीत नवे देऊन गेलीस
चोरूनी नजरेस तू
भाव उगीच खाऊन गेलीस
रोज वाट पहाण्याचा
छंद मला लावून गेलीस
वेदना जुण्याच परंतू
अर्थ नवा देऊन गेलीस

