डिजिटल होतोय मी
डिजिटल होतोय मी
आधी डेस्कटॉप मग लॅपटॉप
मोनोटप जेलीबिनचे जाळे विणतो
मीच माज्या भोवती
कारण डिजिटल होतोय मी
ऑनलाईन माझी कामे होती
नको रांगांची तासन्तास कटकट
ऑनलाईन अआरक्षण करतो मी
कारण डिजिटल होतोय मी
नको मज बटनांची टकटक
स्क्रीनटचचे मग लागले वेध
व्हॉइस कमांड ची नवी रीत
निर्माण करतो बुद्धीवर खेद
हे सगळंच सहज आजमावतो मी
कारण डिजीटल होतोय मी
हॉर्मोन्स चा झाला लोचा
सजीवला रोबोटिक्सची वाचा
एरर च्या पडल्या खाचा
हेच सगळं मी पण बोलतोय
कारण डिजीटल होतोय मी
