दैवी सूर हरवला💐🙏
दैवी सूर हरवला💐🙏
सा, रे,ग, म, प,ध, नि
सुरांचे सात स्वर
केले तुम्ही आत्मसात
सुंदर आवाज हा दैवी वर-1
देशभक्तीचे गाणे तुम्ही
अंतकरणातून गातांना
भिडत असे सूर हृदयात
गाणे तुमचे ऐकतांना-- 2
गीत तुमचे ऐकतांना
कान होतसे मंत्रमुग्ध
संगीत कार्यक्रम तुमचा की
जसा योग शर्करादुग्ध-- 3
अनेक गाण्यांना तुमच्या
मिळाले पुरस्कार, सत्कार झाला।
आज गाणकोकीळा शांत झाली
अन जनतेच्या नयनी अश्रुधारा--4
प्रत्येक गाण्यात तुमच्या तुम्ही
सुमधुर आठवण ठेऊन गेल्या।
सर्वसामान्य जनतेच्या कधीच
तुम्ही आपल्याश्या झाल्या--5
भारतातील आज
संगीताचा दैवी सूर हरवला
भावपूर्ण श्रद्धांजली
भारताच्या गाणकोकीळेला
भारताच्या गाणकोकीळेला
