दैव
दैव
गोठलेल्या वाटेला,
रांग माणसांची,
फुललेला फ़ुलांना,
काटी फांदीची.
बोल बोलांच्या शब्दांना,
माणूस सोशीत जातो,
हरी जरी जगाचा,
पाय कोणाचे धरतो.
फळांच्या झाडांना,
मार दगडांचा,
जखमेवर फुंकर,
अलगद हवेची,
जखम झाली बरी,
खूण,तरी दैवाची.
उरी बसले शब्द,
तरी शब्द का धरतो,
फुटू नाही उर म्हणून,
शब्द सांभाळतो.
शब्दांना तीर सारे,
जखम जीवाची.
सुम्ब जळून गेले,
पीळ का दिसतो,
पिळून शरीर त्याचे,
खाचेत बसवितो.
सांगा उत्तर बरे,
पीळ का राहतो.?
जखम बोटाला,
पितांबर का फाडला,
जखम बोटाला,
थांब चिंधी शोधते,
धरून पितांबर
तू का फाडते?
दैव जसे तसें,
मिळे सारे काही,
दोष आपुल्या कर्माचे,
मिळे दुःख थोडे,
गुण आपुल्या कर्माचे,
सुख ही, पहा थोडे थोडे.
